राज्य पुरस्कृत पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना
अ) ग्रामपंचायत निवडीचे व पहिल्या वर्षीच्या अनुदान वाटपाचे निकष :-
1) पहिल्या वर्षात ग्रामपंचायतीच्या हद्दीत लोकसंख्येच्या किमान 50% झाडे लावून जगविली पाहीजे. पुढे दोन वर्षात उर्वरीत 50% आणखी झाडे लावून जगविणार असल्याची हमी ग्रामसभेने दिली पाहीजे.
2) किमान 60% हागणदारी मुक्त ग्रामपंचायत (त्यानंतरच्या 2 वर्षात गाव निर्मल करणे बंधनकारक राहील.
3) सर्व प्रकारची कर वसुली : ग्रामपंचायतीने क्षेत्रफळावर आधारीत मालमत्ता कर आकारणी तसेच सुधारीत दराने पाणीपट्टी बसवून नजीकची फेरआकारणी नियमाप्रमाणे केली असल्यास व त्यानुसार किमान 60% थकबाकीसह कर वसूली करणे आवश्यक आहे.
4) गावात शासनाच्या प्रचलित नियमानुसार म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणा-या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी करावी. तसेच विविध उत्सवातील मुर्तीचे विसर्जन करतांना पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा ठराव करून त्याची पुढील लगतच्या वर्षापासून अंमलबजावणी करावी.
5) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेतला पाहिजे व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमी दिली पाहीजे व त्याप्रमाणे लगतच्या पुढील वर्षापासुन ती कृतीत आणली पाहिजे.
6) यशवंत पंचायत राज अभियानात भाग घेण्याची हमी दिली पाहीजे व त्याप्रमाणे लगतच्या पुढील वर्षापासुन ती कृतीत आणली पाहिजे
. ब) ग्रामपंचायत निवडीचे व दुस-या वर्षीच्या अनुदान वाटपाचे निकष :-
1) या वर्षातील एकूण अनुदानाच्या 50% अनुदान हे पुर्वीच्या वर्षात लावलेली झाडे जगल्याच्या प्रमाणानुसार राहिल. परंतु किमान 25 % पेक्षा जास्त झाडे जगल्यासच टक्केवारीच्या प्रमाणात अनुदान देण्यात येईल. गावातील कुटूंबाइतकी झाडे पहिल्या वर्षी लावली नसल्यास उर्वरीत 50% झाडे दुस-या वर्षात लावावीत.
2) दुस-या वर्षाचे उर्वरीत 50% अनुदान खालील निकष पुर्ण केल्यानंतर देण्यात येईल. 1) 75% हागणदारी मुक्त ग्रामपंचायत 2) सर्व प्रकारची कर वसुली, ग्रामपंचायतीने मालमत्ता कर क्षेत्रफळावर आधारीत कर आकारणी करून व सुधारीत दराने पाणीपट्टी बसविणे, नजीकच्या फेरआकारणी नियमाप्रमाणे केली असल्यास व त्यानुसार 80% थकबाकीसह कर वसुली करणे आवश्यक आहे.
3) गावात शासनाच्या प्रचलित नियमानुसार म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणा-या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी कायम ठेवून सातत्य राखले पाहिजे. तसेच विविध उत्सवातील मुर्तीचे विसर्जन करतांना पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली पाहिजे.
4) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा परिषद मतदारसंघ स्तरीय किंवा त्यावरील तपासणीत किमान 50% गुण मिळाले पाहीजेत.
5) लोकाभिमुख उत्तम शासनासाठी यशवंत पंचायत राज अभियानात किमान 50% गुण मिळाले पाहीजेत.
6) अपांरपारिक उर्जामध्ये 50% स्ट्रीट लाईट सौर उर्जा/CFL/LED) बसविणे व किमान 1% कुटूंबाकडे बायोगॅस वापर असावा. 7) घानकचरा व्यवस्थापन अंतर्गत 100% कचरा संकलन व किमान 50% कच-यापासून खत निर्मीती करावी किंवा लॅन्डफील पध्दतीने विल्हेवाटीची व्यवस्था करावी.
8) सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 50% व्यवस्था करून त्यासाठीची कामे करावीत.
क) तिस-या वर्षीचे अनुदान हे खालील निकषानुसार देण्यात येईल :-
1) तिस-या वर्षाच्या एकूण अनुदानाच्या 50% अनुदान हे पुर्वी लावलेली झाडे जगल्याच्या प्रमाणानुसार राहिल. परंतु किमान 50 % पेक्षा जास्त झाडे जगल्यासच टक्केवारीच्या प्रमाणात अनुदान देण्यात येईल.
2) उर्वरीत 50% अनुदान हे खालील निकष पुर्ततानुसार देण्यात येईल. 1) 100% हागणदारी मुक्त ग्रामपंचायत झाली असावी व निर्मलग्राम पुरस्कारासाठी राज्याने शिफारस केली असावी. 2) सर्व प्रकारची कर वसुली, ग्रामपंचायतीने क्षेत्रफळावर आधारीत मालमत्ता कर आकारणी करून नजीकची फेरआकारणी नियमाप्रमाणे केली असल्यास व त्यानुसार 90% थकबाकीसह कर वसुली करणे आवश्यक आहे.
3) गावात शासनाच्या प्रचलित नियमानुसार म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असणा-या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी कायम ठेवली व अंमलबजावणी केली असावी. तसेच विविध उत्सवातील मुर्तीचे विसर्जन करतांना पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टीने उपाययोजना सातत्याने अंमलात आणवी.
4) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा परिषद मतदारसंघ स्तरीय किंवा त्यावरील तपासणीत किमान 60% गुण मिळाले पाहीजेत.
5) यशवंत पंचायत राज अभियानात किमान 60% गुण मिळाले पाहीजेत.
6) अपांरपारिक उर्जामध्ये 100% स्ट्रीट लाईट (Street Light) सोलर (CFL/LED) बसविणे किमान 2% कुटूंबाकडे बायोगॅस वापर असणे, 10% कुटूंबाकडे सौर उर्जा/CFL/LED चा वापर प्रत्यक्ष असावा.
7) घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 100% शास्त्रशुध्द कचरा संकलन 100% कच-यापासून खत निर्मीती किंवा लॅन्डफील पध्दतीने विल्हेवाट किंवा तत्सम शास्त्रशुध्द व्यवस्थापन व्यवस्था.
8) सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 75% व्यवस्था व त्यानुसार काम.
Rajarshi Shahu pratishthan. All Rights Reserved AIS.